वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यशासनाचा निर्णय !

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने ३० मार्च या दिवशी अधिसूचना काढली असून ती ३० जूनपर्यंत राज्यभरात लागू रहाणार आहे.

वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटींनी वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत रहाण्यासाठी राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणार्‍या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.