
सोलापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगली कामे करत आहेत. सर्वकाही व्यवस्थित चालू असतांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही विरोधकांची मागणी निरर्थक आहे. अधिकार्यांना केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा असून त्याविना हे होऊ शकत नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर केला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापाच्या वेळी आमदार शिंदे बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याविषयी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देणार आहोत.’
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल
‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !
सिंहस्थ कुंभपर्वाची कामे वेळेत पूर्ण करावीत !
मुंब्रा येथे बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्यांवर कारवाई !