बनावट नोटा देऊन शेतकर्‍याची फसवणूक करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात

६७ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त


सोलापूर – मोडनिंब येथील आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेतकर्‍याची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सिद्धेश्‍वर कैचे याच्यासह त्याच्या सहकार्‍याला पोलिसांनी कह्यात घेतले. (यावरून बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे. – संपादक)
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून ६७ सहस्र रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. यामध्ये २ सहस्र आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. आरोपीकडे या नोटा कोठून आल्या याची पडताळणी पोलीस करत आहेत.