कराड येथे मृत पक्षी आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण

कराड, २५ जानेवारी (वार्ता.) – शहरातील काही ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षी कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, याविषयी अजून कोणतेही निदान झालेले नाही. मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. तसेच मृत पक्षी आढळल्यास तातडीने कराड नगापलिकेला याविषयी माहिती द्यावी, असे आवाहन कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.