शेतकर्यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्यांना चपराक !

नवी देहली – देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली. त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. काही लोकांनी रणवीत सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या वाहनापर्यंत सुरक्षितपणे नेले. रणवीत सिंह गाडीत बसल्यानंतरही काही जणांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, असा आरोप रणवीत सिंह यांनी फेसबूकद्वारे केला आहे. रणवीत सिंह ‘जनसांसद’ कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी आंदोलनस्थळी गेले असता हा प्रकार घडला. या घटनेच्या वेळी त्यांच्यासमवेत अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह आणि आमदार कुलबीर सिंह हेही उपस्थित होते.
रणवीत सिंह यांनी म्हटले की, काही समाजकंटकांचा हेतू अस्पष्ट आहे. त्यांनी आमच्यावर आक्रमण करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला. या आक्रमणामागे शेतकरी असण्याचा प्रश्नच नाही. कुणीतरी जाणुनबुजून हे आक्रमण केले आहे, असाही दावा त्यांनी केला.
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
संपादकीय : मनसुबे उघड !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !