मद्यधुंद टँकर चालकाने १५ वाहनांना ठोकले : ७ जण गंभीर

शिवतीर्थ ते समर्थ मंदिर रस्त्यावरील घटना

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २५ जानेवारी (वार्ता.) – २४ जानेवारी या दिवशी सायंकाळी शहरातील शिवतीर्थ (पोवई नाका) ते समर्थ मंदिर या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत वेगाने टँकर चालवत १५वाहनांना ठोकले. नागरिकांनी पाठलाग करत या टँकरचालकाला समर्थ मंदिर येथे पकडले. या वेळी नागरिकांचा राग अनावर झाल्याने त्यांनी वाहनचालकाला चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालकाला नागरिकांकडून कह्यात घेतले.

(मद्य पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल. – संपादक) या अपघातामध्ये ५-६ वाहनांचा अपघात झाला असून काही नागरिक किरकोळ घायाळ झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून सोडण्यात आले आहे; मात्र यातील ७ जण गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.