मेट्रोच्या स्थानकाजवळ राजभवनावर जाणारा मोर्चा अडवला !

राजभवनावर जावे कि न जावे यासाठी २ गट पडले !

मुंबई – सहस्रोंच्या शेतकर्‍यांचा मोर्चा राजभवनाकडे निघाला होता. तो मेट्रो स्थानकाच्या बाहेरील चौकात अडवण्यात आला. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गोव्याला गेल्याने ते पळपुटे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली. मेट्रो चौकात दुपारी ३ ते ४ या वेळेत मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी नेते अजित नवले यांनी आडमुठी भूमिका घेऊन मोर्चा स्थळावरून हालण्यास नकार दिला. ‘राज्यपाल निघून गेले हा लोकशाहीसाठी वाईट पायंडा आहे’, असे सचिन सावंत या वेळी म्हणाले. शेतकरी नेते अजित नवले हे सतत ‘पोलीस शेतकर्‍यांची पोरे आहेत, त्यांच्याशी आमचे वैर नाही, आमच्यावर त्यांना सोडले आहे’, असे माध्यमांना सांगत होते.

या मोर्च्यामुळे पोलिसांपुढे कायदा आणि सुव्यवस्थेतेचे मोठे दायित्व निर्माण झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी नेते यांच्या शिष्टमंडळातील मेधा पाटकर, नसीम खान, फिरोज मिठीबोरवाला, सचिन सावंत आदी २३ नेत्यांना राजभवनकडे नेण्यासाठी पोलीस व्हॅनमध्ये बसवले होते; परंतु राजभवनावर निवेदन द्यायला जावे कि न जावे या संदर्भात या नेत्यांमध्ये दोन गट पडले. या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही नेता नव्हता.

सौजन्य : टी.व्ही.9 मराठी