सनातनचे हितचिंतक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक गुरुप्रसाद जयस्वाल यांचे निधन !

यवतमाळ येथील सनातनचे हितचिंतक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक गुरुप्रसाद नत्थुलाल जयस्वाल (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ जानेवारी २०२१ या दिवशी दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे ३ मुले, ३ सुना, २ मुली, २ जावई आणि नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पुढाकाराने त्यांचे कुटुंबीय सनातनच्या धर्मकार्यात सहभागी आहेत. सनातन परिवार जयस्वाल परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.