‘सर्व ईश्‍वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना आपल्या संदर्भात काही प्रतिकूल जरी घडले, तरी ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे असा विचार मनात येतो.

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये.

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !

वैद्यनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अजीज इस्माईल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या कह्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती अजीज इस्माईल तथा मंगलदादा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे २५ सहस्र आरोपींना जामीन

शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. शिवाजीनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ७ गुन्हे नोंद करत ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक निलंबित !

गंभीर गुन्ह्यातील तपासात अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या दोन अधिकार्‍यांना निलंबित केले. 

कोल्हापुरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रहित झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया या बँकेचा परवाना रहित करण्यात आला आहे.

पुण्यातील अडीच सहस्र नागरिकांची ऑनलाईन खरेदी-विक्री करतांना फसवणूक

कोरोना महामारीच्या काळात नागरिक ‘ऑनलाईन’ खरेदीवर भर देतांना दिसत आहेत; मात्र या प्रकारात नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रकारांतही शहरात वाढ झाली असून मागील ११ मासांत पुण्यातील अडीच सहस्र नागरिकांची ऑनलाईन खरेदी-विक्री करतांना फसवणूक झाली आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्याशी संबंधित आणि कार्यालयीन सहकार्‍यांकडेही चौकशी चालू केली आहे.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, तुळजापूर, अंबाजोगाई, पंढरपूर येथे निवेदन सादर