हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, तुळजापूर, अंबाजोगाई, पंढरपूर येथे निवेदन सादर
सोलापूर, २५ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपान, धूम्रपान आणि मेजवान्या करणे यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, तुळजापूर (जिल्हा धाराशिव), अंबाजोगाई (जिल्हा बीड), पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पोलीस आणि प्रशासन यांना देण्यात आले.
सोलापूर – येथील पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रमेश आवार, बालराज दोंतुल, धनंजय बोबडे, शिवाजी चिंता आदी उपस्थित होते.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील नायब तहसीलदार शितल कन्हेरे-गायकवाड यांना, तसेच तुळजापूर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री ह.भ.प. आकाश महाराज मगर, गोपाळ साखरे, संतोष पिंपळे, भगवान श्रीनामे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अमित कदम, सुरेश नाईकवाडी, उमेश कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – येथील पोलीस निरीक्षक कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या वेळी विशाल जहागिरदार, बालाजी भारसकर यांसह हिंदु जनजागृती समितीचे आकाश चौरे, मंगेश बारस्कर आदी उपस्थित होते.
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री गणेश लंके, प्रथमेश जोशी, रामेश्वर कोरे, हिंदु जनजागृती समितीचे शशीशेखर पाटील आदी उपस्थित होते.