पुणे – कोरोना महामारीच्या काळात नागरिक ‘ऑनलाईन’ खरेदीवर भर देतांना दिसत आहेत; मात्र या प्रकारात नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रकारांतही शहरात वाढ झाली असून मागील ११ मासांत पुण्यातील अडीच सहस्र नागरिकांची ऑनलाईन खरेदी-विक्री करतांना फसवणूक झाली आहे. यात कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये ‘ओ.एल्.एक्स.’ या संकेस्थळावरून जुन्या वस्तू खरेदी-विक्री करतांना १ सहस्र ३३१ नागरिकांची फसवणूक झाली होती. आतापर्यंत १ सहस्र २०७ नागरिकांची ‘ओ.एल्.एक्स.’वरून फसवणूक झाली आहे. या वर्षी नवीन वस्तू ऑनलाईन खरेदी करतानाच्या गुन्ह्यात तिप्पट वाढ झाली.
या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदीमध्ये ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पर्याय निवडा, सुरक्षित आणि विश्वसनीय संकेस्थळावरूनच ऑनलाईन खरेदी करा, अशा काही सूचना ‘सायबर सेल’ने केल्या आहेत.