काणकोण तालुक्यातील तिर्वाळ-मार्ली या रस्त्याला गोवा मुक्तीनंतर तब्बल ६० वर्षांनी संमती

मार्ली हा काणकोण तालुक्यातील अत्यंत मागास भागातील वाडा असून येथील विद्यार्थी, आजारी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यांमुळे पुष्कळ त्रास होतात.

१ जानेवारीपासून पंचायतींना समान ‘कॅडर’

राज्यातील पंचायतींना १ जानेवारीपासून समान ‘कॅडर’ लागू केला जाणार आहे. यामुळे पंचायत संचालकांना एका पंचायत कार्यालयातील कर्मचार्‍याला दुसर्‍या पंचायत कार्यालयात स्थलांतर करणे शक्य होणार आहे.

अशी कारवाई संपूर्ण देशात हवी !

उत्तरप्रदेशमध्ये वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्यांवर जातीचे नाव लिहिण्याची पद्धत चालू आहे. यातून जातीचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र आता उत्तरप्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे जातीची ओळख सांगणार्‍या गाड्यांवर कारवाई करणे चालू केले आहे.

जि.पं. सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांनी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात पणजी पोलीस, सायबर गुन्हे विभाग आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालय यां ठिकाणी तक्रार नोंदवली आहे.

शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिरात ३० डिसेंबरला ह.भ.प. सुहासबुवा वझे यांचा नामस्मरणाचा कार्यक्रम

सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिरात ३० डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे आणि साथी कलाकार यांच्या नामस्मरणाचा कार्यक्रम होणार आहे.

काश्मीर पुन्हा भारतात आणण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण करणारी ‘पनून कश्मीर’आणि तिचा उद्देश

आज ‘काश्मिरी हिंदूंचा ‘होमलॅण्ड डे’ आहे. यानिमित्ताने… ‘पनून कश्मीर’ची युवा शाखा ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे महाराष्ट्र प्रमुख श्री. राहुल कौल यांनी ‘पनून कश्मीर’ संघटनेची स्थापना, तिचा उद्देश आणि तिचे कार्य यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

वर्ष २०२१ मध्ये येणार्‍या ‘गुरुपुष्यामृत योगां’विषयीची वैशिष्ट्ये !

साधकांनी ‘गुरुपुष्यामृत योगा’वर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनाचे सोने करण्यासाठी गुरूंचे आज्ञापालन करून अष्टांग साधनेचे शुभकार्य करण्याचा प्रयत्न करूया.’

शास्त्रानुसार साधना न केल्याने साधिकेच्या कुटुंबियांना आलेल्या अनेक अडचणी !

वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्रासाची तीव्रता न्यून झाली. घरातील प्रत्येकाचे प्रारब्ध तीव्र असूनही त्या तुलनेत साधना न केल्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तीगत जीवनात अडचणी येत आहेत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये !

उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्रांविना आणि संशोधनाविना अंतिम सत्य सांगणारे ऋषी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले