
पणजी, २७ डिसेंबर (वार्ता.) – नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांनी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात पणजी पोलीस, सायबर गुन्हे विभाग आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालय यां ठिकाणी तक्रार नोंदवली आहे. सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स हे ‘फेसबूक’च्या माध्यमातून केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि मला अपकीर्त करत असल्याचे सिद्धेश नाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स प्रयत्नरत होते, असा आरोप सिद्धेश नाईक यांनी केला आहे. पणजी पोलिसांनी हा अदखलपात्र गुन्हा असल्याचे सिद्धेश नाईक यांना कळवले आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !