सांताक्रूझ आणि पाळोळे येथून ५ लाख ३० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

सांताक्रूझ येथे टाकलेल्या धाडीत १ लाख ६२ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.

नागरोटा येथे ठार झालेले ४ आतंकवादी भुयारातून भारतात घुसल्याचे उघड

जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ४ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले होते. सुरक्षादलाच्या शोधमोहिमेत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक भुयार सापडले आहे.

पंचतारांकित हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत ! – गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला घरचा आहेर

आझाद यांनी काँग्रेसने निवडणुकीत विजय मिळवण्याची आशा आता सोडून देऊन तिचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी पुरेसे आहे, असेच जनतेला वाटते !

लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायद्यामुळे हिंसाचार आणि खून यांना आळा बसेल !   प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहास अभ्यासक

लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणे, ही शासनाची चांगली चाल आहे.

नास्तिकपणामुळे झालेली हानी !

आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्‍वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही.

आजचा वाढदिवस : चि. अद्वैत मत्ते

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. अद्वैत सचिन मत्ते (वय २ वर्षे) याचा कार्तिक शुक्ल पक्ष दशमी (आज) या दिवशी वाढदिवस आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून कार्यवाही ! – लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ योजनेच्या कार्यवाहीसाठी गोवा शासन नियुक्त २७ सदस्यीय समितीचे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे अध्यक्ष आहेत.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांचा जो बायडेन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मानण्यास नकार

अमेरिकी लोकांचा आत्मविश्‍वास असलेल्या कुणाहीसमवेत आम्ही काम करू; मात्र हा आत्मविश्‍वास असलेल्या व्यक्तीचा विजय विरोधीपक्षाला मान्य असेल, तरच काम करू.

मानवातील जीवनाचे महत्त्व

मानवी जीवन हे अनेकानेक लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राप्त होत असते. आपण असे लक्षात ठेवले पाहिजे की, पद्मपुराणात म्हटल्याप्रमाणे जीवयोनींची संख्या ८४ लाख आहे.

पाकमधील व्यवसाय बंद करू ! – गूगल, फेसबूक आदींची पंतप्रधान इम्रान खान यांना चेतावणी

पाक सरकारने संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांवर असलेल्या लिखाणाविषयी नवे नियम लागू केले आहेत. यामुळे फेसबूक, गूगल आणि ट्विटर यांनी पाकमधील त्यांचा व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.