मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजता उमेदवार अर्ज भरणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. ठाणे येथील कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते अर्ज भरणार आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे २४ ऑक्टोबर या दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस पालटला आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.