मानवातील जीवनाचे महत्त्व

मानवी जीवन हे अनेकानेक लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राप्त होत असते. आपण असे लक्षात ठेवले पाहिजे की, पद्मपुराणात म्हटल्याप्रमाणे जीवयोनींची संख्या ८४ लाख आहे. जीवनाचा आरंभ जलचरांपासून होतो; कारण वैदिक वाङ्मयावरून आपणाला कळून येते की, सृष्टीच्या आरंभी संपूर्ण ब्रह्मांड पाण्यात एकरूप झालेले होते. हे भौतिक जग पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या ५ स्थूल महाभूतांपासून झालेले आहे. याखेरीज मन, बुद्धी आणि अहंकार ही ३ सूक्ष्म तत्त्वे आहेत. या पडद्यांच्या मागे जीवात्मा आहे आणि तो या ८ तत्त्वांनी आच्छादलेला आहे.

बालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च ।
भागो जीवः स विज्ञेयः स चानन्त्याय कल्पते ॥

– श्‍वेताश्‍वतरोपनिषद्, अध्याय ५, वाक्य ९

अर्थ : जीव हा केसाग्राच्या शंभराव्या भागाच्या शंभराव्या भागाएवढा (केसाग्राच्या एक दशसहस्रांश) आहे. असे जीव संख्येने अनंत आहेत.

– स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद

(संदर्भ : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)