मुंबई – येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून ४५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून प्रमोद (राजू) पाटील हे एकमात्र उमेदवार निवडणून आले होते.