लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायद्यामुळे हिंसाचार आणि खून यांना आळा बसेल !   प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहास अभ्यासक

पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – सध्या देशभरात ‘लव्ह जिहाद’ ची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनवण्यात येणार आहे. या कायद्यानुसार कायदा भंग करणार्‍याला ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात येईल. हा दखलपात्र गुन्हा ठरणार असून त्याविषयी जामीन देण्यात येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील धेंपे कॉलेजमधील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. प्रजल साखरदांडे यांनी या कायद्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणे, ही शासनाची चांगली चाल आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली होणारा हिंसाचार आणि खून यांसारख्या घटनांना आळा बसेल. उत्तर भारतात या ‘लव्ह जिहाद’चे प्रमाण वाढले आहे. हा कायदा देशभरातच लागू करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.’’