‘अंफान’ महाचक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू

नवी देहली – ‘अंफान’ हे महाचक्रीवादळ २० मेच्या सायंकाळी बंगाल आणि ओडिशा राज्यांच्या समुद्रकिनार्‍यांवर धडकल्याने आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांत प्रत्येकी दोघांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ताशी ११० किमीच्या वेगाने या राज्यांच्या समुद्रकिनार्‍यावर हे वादळ धडकले आहे. यापासून रक्षण होण्यासाठी ओडिशामध्ये आतापर्यंत १ सहस्र ७०४ आश्रय छावण्या उभारण्यात आल्या आहेत. किनार्‍याजवळील दीड लाख, तर बंगालमध्ये ३ लाख ३० सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे, अशी माहिती एन्.डी.आर्.एफ्.च्या प्रमुखांनी दिली.