जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाकडून अमेरिका आणि कॅनडा देशांमध्ये बेबी पावडरची विक्री बंद

या पावडरमुळे कर्करोग होत असल्याचा लोकांचा दावा

पावडरमुळे कर्करोग होत असल्यामुळे अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाच्या विरोधात अनेकांनी खटले प्रविष्ट केले. ते ग्राह्य धरून तेथील न्यायालयाने तिला दंड ठोठावला होता. जागतिक स्तरावर या आस्थापनाला विरोध असतांना आता भारत सरकारनेही या आस्थापनावर भारतात बंदी घालणे आवश्यक !

वॉशिंग्टन (अमेरिका) – जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाने तिच्या ‘बेबी पावडर’ या उत्पादनाची विक्री अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांत बंद केली आहे. या दोन्ही देशांत या उत्पादनाच्या मागणीमध्ये प्रचंड घट झाल्याने त्याची विक्री बंद करण्यात आली आहे. या दोन्ही देशांमध्ये ‘या पावडरमुळे कर्करोग होतो’, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ही पावडर कुणीही खरेदी करत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच या देशांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनावर १९ सहस्रांहून अधिक खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत. या खटल्यांच्या माध्यमांतून ‘या पावडरमुळे कर्करोग होतो’, असा आरोप करण्यात आला आहे.