‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा पणजी (गोवा) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्कार

सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार ! ‘कोणतेही राष्ट्र त्यातील सैनिक, किसान आणि शिक्षक या ३ क्षेत्रांच्या आधारावर टिकून रहाते. सैनिक प्राण तळहातावर घेऊन देशासाठी लढत असतो. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान असतो.

देशभरातील शेतकर्‍यांचा बंद शांततेतच !

‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !

प्रतिलिटर पेट्रोलचे मूल्य ४० रुपये असले पाहिजे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

९० रुपये मूल्य असणार्‍या प्रतिलिटर पेट्रोलमध्ये त्याचे मूळ मूल्य केवळ ३० रुपये असते; मात्र त्यानंतर विविध कर, पेट्रोल पंपचे कमिशन आणि अन्य खर्च ६० रुपये असतो. त्यामुळे त्याचे मूल्य ९० रुपये होते.

सिलीगुडी (बंगाल) येथे पोलिसांच्या लाठीमारात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू !

बंगालमध्ये पोलीस कधी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करतात का ? आणि केला, तर त्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू होतो का ?

प्रभावशाली व्यक्तींनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करतांना दायित्वाने वागावे ! – सर्वोच्च न्यायालय

आज देशात भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या नावाखाली व्यक्तीच्या चारित्र्यासह धर्मांवर शिंतोडे उडवले जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयाने प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

देहलीमधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले

अशा प्रकारच्या घटना घडतात, हे पोलीस आणि शासनयंत्रणा यांना लज्जास्पद ! गोहत्या करणार्‍यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी देशात त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तेथे जलद गतीने खटले चालवणे आवश्यक आहे !

डॉ. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वहाण्यास गेलेले हिंदु मक्कल कत्छीचे अर्जुन संपथ यांच्याशी द्रमुक आणि व्ही.सी.के. यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरवर्तन

समानतेसाठी लढा देणार्‍या बाबासाहेबांच्या नावाखाली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजाचा व्यापक विचार करू शकतील का ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचाच आग्रह का ? – सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

जनार्दन मून यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संघटना नोंदणीस नकार देऊन त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

अभिनेते सैफ अली खान यांच्याविरोधात देहली येथे गुन्हा नोंद

विश्‍व हिंदु महासंघाचे देहली प्रदेशाध्यक्ष राजेश तोमर यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी सैफ अली खान यांनी क्षमायाचना केलेली आहे.

देशभरात कोरोनाच्या संदर्भातील सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्याच्या ४० सहस्र तक्रारी

कोरोनासारख्या संकटात भ्रष्ट भारतीय हे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्यातही पुढे आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !