प्रभावशाली व्यक्तींनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करतांना दायित्वाने वागावे ! – सर्वोच्च न्यायालय

आज देशात भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या नावाखाली व्यक्तीच्या चारित्र्यासह धर्मांवर शिंतोडे उडवले जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयाने प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

अमिश देवगण

नवी देहली – सामान्य लोकांवर प्रभावशाली व्यक्तींचा प्रभाव आणि अधिकार यामुळे त्यांचे लोकांविषयीचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांनी अधिक उत्तरदायित्वाने वागायला हवे, हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

ख्वाजा मोईउद्दीन चिश्ती यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी एका वृत्तवाहिनीचे निवेदक अमिश देवगण यांच्यावरचा एफ्.आय.आर्. रहित करण्यास न्यायालयाने नकार देतांना हे विधान केले.