राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचाच आग्रह का ? – सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

नागपूर येथील जनार्दन मून यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावानेच संघटना नोंदणीचा तुमचा आग्रह का आहे ? स्वयंसेवकांना या नावाने संभ्रमित करण्याचा हेतू त्यामागे आहे काय ? अशी परखड विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने येथील जनार्दन मून यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संघटना नोंदणीस नकार देऊन त्यांची याचिका ६ डिसेंबर या दिवशी फेटाळून लावली.


जनार्दन मून यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या नावाने संघटना स्थापन करण्याची अनुमती सहधर्मादाय आयुक्तांना केली होती; परंतु सहधर्मादाय आयुक्तांनी ही अनुमती नाकारली. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर प्रविष्ट केली होती; मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर वरील सुनावणी झाली.