अभिनेते सैफ अली खान यांच्याविरोधात देहली येथे गुन्हा नोंद

‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या भूमिकेविषयी केलेले आक्षेपार्ह विधान

नवी देहली – अभिनेते सैफ अली खान यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या भूमिकेवरून केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून त्यांच्याविरोधात येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विश्‍व हिंदु महासंघाचे देहली प्रदेशाध्यक्ष राजेश तोमर यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी सैफ अली खान यांनी क्षमायाचना केलेली आहे.

 (सौजन्य : Zee Hindustan)

राजेश तोमर यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, सैफ अली खान यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले आहे जेणेकरून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात. समाजात शांतता भंग होण्याचा धोका वाढला आहे.