घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागले !

यामुळे मुंबईत १४.२ किलो वजनाचा सिलिंडर आता ९९९ रुपये ५० पैशांना मिळणार आहे. यापूर्वी मार्च मासामध्येही सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती.

झारखंडमधील आय.ए.एस्. अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरांवर ‘ईडी’च्या धाडी !

सनदी लेखपालच्या घरातून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त
सरकारने अशा भ्रष्ट अधिकार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

‘भारतीय नागरिक’ म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीवर ‘परकीय’ म्हणून खटला चालवता येणार नाही ! – गुवाहाटी उच्च न्यायालय

याआधी अनेक लोकांना ‘भारतीय नागरिक’ म्हणून घोषित केल्यानंतरही त्यांच्यावर परकीय नागरिक असल्यावरून लवादापुढे खटले चालवण्यात आले आहेत. त्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकांची एकत्रितपणे सुनावणी करण्यात आली.

सरकारी शाळांत होणार्‍या धर्मांतराविषयी दिशानिर्देश सिद्ध का केले नाहीत ?

शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !

मैसुरू (कर्नाटक) येथील एका गावाला ‘छोटे पाकिस्तान’ म्हणणाऱ्या मुसलमानांच्या चौकशीचा आदेश

देशात जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत, त्या भागाला बहुतेक करून ‘छोटे पाकिस्तान’ असे म्हटले जात असल्याचे ऐकिवात येते. याविरोधात देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच शासनकर्ते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

सूरत येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करणार्‍या विद्यार्थ्यास फाशी !

शिक्षा सुनावतांना न्यायालयाकडून मनुस्मृतीतील श्‍लोकाचा उल्लेख

राजगडावर (जिल्हा संभाजीनगर) ७ दरवाजांना नवी झळाळी; सहस्रोंच्या उपस्थितीत प्रवेशद्वारांचे लोकार्पण !

छत्रपती शिवरायांचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील २ प्रवेशद्वारे, गुंजवणे या मार्गाने येणार्‍या चोर मार्गांवरील ३ प्रवेशद्वारे, संजीवनी माची प्रवेशद्वार आणि बालेकिल्ला अशी प्रवेशद्वारे आहेत.

या वर्षी भारतात १० दिवस आधीच पावसाळ्याला प्रारंभ होणार !

बंगालच्या उपसागरात, तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय पालटांमुळे पावसाळा लवकर येणार आहे, असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने वर्तवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच खरी जातीयवादी आहे, हे समोर आले ! – नितीन शिंदे

‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ अशा संघटनेच्या प्रमुखांना संपवण्याचे षड्यंत्र कसे रचले जाते, याचे हे चांगले उदाहरण आहे. या प्रकरणी पू. गुरुजी यांच्यावर खोटे आरोप करणारे शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी गुरुजींची पाय धरून क्षमा मागणे आवश्यक आहे.’’

मेहसाणा (गुजरात) येथे भोंग्यांवरून आरती ऐकल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज गावात मंदिरात भोंग्यांवरून आरती ऐकवल्याच्या प्रकरणी जसवंतजी ठाकोर या ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समाजातील व्यक्तींनी हत्या केली. या प्रकरणी ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.