पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २४ महसुली गावांतील गावठाण क्षेत्राचे नगर भूमापन होणार !

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २४ महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे, भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज सिद्ध करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

नायलॉन मांजा बाळगणार्‍यांवर गुन्हे नोंद करण्याचा संभाजीनगर खंडपिठाचा आदेश

चिनी नायलॉन मांजा बाळगणार्‍यांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी नुकतेच पोलिसांना दिले आहेत.

नववर्ष स्वागताच्या पार्टीत तरुणीची हत्या

नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीत मुंबईत एका तरुणीची हत्या करणार्‍या मित्रांना कह्यात घेतले आहे. खारमध्ये (पश्चिम) येथे ही घटना घडली.

माहिम दर्ग्याचे विश्‍वस्त डॉ. मुदस्सर निसार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद

डॉ. निसार यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते.

सांडपाण्याच्या नाल्यावर प्राचीन मंदिराचा स्तंभ ठेवण्यात आल्याचे छायाचित्र ट्विटर प्रसारित झाल्यावर हिंदूंचा संताप

हिंदूंच्या संतापानंतर प्रशासन, पोलीस आणि पुरातत्व विभाग सक्रीय – हिंदूंना त्यांच्या प्राचीन सांस्कृतिक ठेव्याचे मोल नसल्याने ते अशा प्रकारची कृती करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात ! तसेच सरकार, प्रशासन आणि पुरातत्व विभागही निष्क्रीय रहाते !

गोव्यात जानेवारीत कोरोनाचा संसर्ग वाढणार ! – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांची चेतावणी

राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून पर्यटकांच्या मेजवान्या कोणी होऊ दिल्या ? पोलीस आणि प्रशासन यांनी या पर्यटकांकडून कोरोनाविषयीच्या नियमावलीचे पालन का करून घेतले नाही ?

विरोध डावलून शासन मेळावली (सत्तरी) येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार

गोवा शासन स्थानिकांचा विरोध डावलून मेळावली, सत्तरी येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी ‘आयआयटी’च्या पदाधिकार्‍यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते.

इंग्लंडहून गोव्यात आलेल्या १२ कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून नकारात्मक

इंग्लंडहून गोव्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून तपासणीसाठी पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामधील १२ रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून नकारात्मक आले आहेत, तर इतर नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचे उद्घाटन जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात होणार

चिपी-परूळे येथे साकारात असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. २० जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी आरक्षण चालू होणार आहे.

मळावाडी, माणगाव येथील चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळावाडी, माणगाव येथे २२ डिसेंबर २०२० या दिवशी श्रीमती अनुराधा गोपीनाथ खरवडे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण १ लाख २७ सहस्र रुपयांची चोरी झाली होती.