१५ जानेवारीपर्यंत प्रकल्पाची सीमा आखण्याची आणि मेळावली येथे पोलीस चौकी उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

पणजी, २ जानेवारी (वार्ता.) – गोवा शासन स्थानिकांचा विरोध डावलून मेळावली, सत्तरी येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी ‘आयआयटी’च्या पदाधिकार्यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित ‘आयआयटी गोवा’ प्रकल्पाला अनुसरून विद्यमान स्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीविषयी माहिती देतांना ‘आयआयटी’चे पदाधिकारी म्हणाले, ‘‘या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेळावली (सत्तरी) येथील प्रस्तावित ‘आयआयटी गोवा’ प्रकल्पाला अनुसरून सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकल्पाची सीमा आखण्याचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच यानंतर बांधकामासंबंधीच्या अनुमतीचे प्रस्ताव मार्गी लावणे आणि वाढीव ‘एफ्.ए.आर्.’ला मान्यता देण्यास सांगितले आहे. प्रस्तावित प्रकल्पाजवळ पोलीस चौकी उभारण्यास सांगण्यात आले आहे.’’
शेळ, मेळावली ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध कायम
शेळ, मेळावली ग्रामस्थांनी प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाला त्यांचा विरोध कायम ठेवला आहे. सुमारे २०० ग्रामस्थांनी गावात जाणारा मुख्य रस्ता १ जानेवारी या दिवशीही अडवून धरला होता. प्रकल्पाचे सर्वेक्षण करणार्यांना प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून वंचित केले जात आहे. गेले कित्येक मास ग्रामस्थांचे हे आंदोलन चालू आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !