बंगालमध्ये भाजपच्याच २ गटांत हाणामारी !

अशा प्रकारे हाणामारी केल्याने जनता कधीतरी मत देईल का ? तृणमूल काँग्रेसमधून आलेले कार्यकर्ते त्यांच्या मूळ हिंसाचारी वृत्तीचा त्याग करणार आहेत का ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !

मेट्रो कारशेडविषयी अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल ! – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, कारशेड कांजूरमार्गला नेले, तर आरेपेक्षा तीनपट अधिक झाडे तोडावी लागतील. केवळ जागा पालटण्याच्या अट्टहासापोटी सहस्रो कोटींची हानी होईल.

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

चित्रपटात काम मिळवून देतो असे सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. बलात्काराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते.

पुण्यातील नामांकित रुग्णालयाने जिन्याच्या कोपर्‍यात लावलेल्या देवतांच्या फरशा हटवल्या !

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने जिन्यातील कोपर्‍यात देवतांच्या फरशा (टाईल्स) लावून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी येथील ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली होती.

तिरंग्याचा ‘मास्क’ वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही

‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर ध्वजसंहितेनुसार ‘राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे वापर करणे’, हा ध्वजाचा अवमानच आहे.

नागपूर येथील केंद्रीय कारागृहात पोलीस शिपाईच अमली पदार्थाचा पुरवठा करत होता !

कारागृहात जाणार्‍या पोलिसांचीच अंगझडती घ्यावी लागते, हे दुदैव होय !

सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘तांडव’ वेब सिरीजचे पोस्टर जाळून व्यक्त केला संताप

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात सोलापूर येथे हिंदु संघटनांच्या वतीने ‘तांडव’ वेब सिरीजचे आणि अभिनेता सैफ अली खानचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला.

सातारा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी एक कृती समिती स्थापन करावी. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचाही समावेश करावा अशी विनंती आहे.

‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी !

‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.

यवतमाळ येथे वेब मालिका ‘तांडव’वर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्रीआणि केंद्रीय माहिती अन् प्रसारणमंत्री यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.