विधानसभेत वैधानिक विकास मंडळाच्या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात वैधानिक विकास मंडळ सिद्ध करण्याच्या कारणावरून खडाजंगी झाली.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार्‍यांपैकी ४२ जणांना कोरोनाची लागण

१ मार्चपासून चालू झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार्‍यांपैकी ४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रवेश नाकारण्यात आला आहे.

कंगना राणावत यांना जामीनपात्र वॉरंट

अभिनेत्री कंगना राणावत यांना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची अपकीर्ती केल्याचा आरोप असल्याच्या प्रकरणात अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून जामीनपत्र वॉरंट देण्यात आले आहे.

देहलीत सोनसाखळी चोरतांना महिलेची हत्या करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अल्पसंख्य धर्मांधांचे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण !

संजय राठोड यांच्याप्रमाणेच आता धनंजय मुंडे यांनी स्वतःविषयीची भूमिका मांडावी !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांची पत्रकार परिषदेद्वारे मागणी

१० मंगल कार्यालयांवर धडक कारवाई करत ७ सहस्र रुपये दंड वसूल

कोरोनाच्या दुसर्‍या साथीचा धोका रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण आणि ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर देण्याच्या सूचना महापालिका आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

‘अँटीलिया’जवळ स्फोटके ठेवल्याच्या वृत्ताचे ‘जैश-उल-हिंद’कडून खंडण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया निवास्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याच्या वृत्ताचे आतंकवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने खंडण केले आहे. या संघटनेने प्रसारित केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, आम्ही अंबानी यांना कधीच धमकी दिली नाही.

अंगारकी चतुर्थीला पुणे येथील मोरया गोसावी गणपति मंदिर दर्शनास बंद रहाणार !

कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी यांमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ मार्च या दिवशी बंद रहाणार आहे.

शफेपूर (संभाजीनगर) येथील शेतकर्‍याची आत्महत्या !

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासकीय उपाययोजनांसाह त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. मनोबल केवळ साधना केल्यानेच वाढणार आहे. यासाठी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे हे दर्शवणारी ही घटना !

वरळी येथील गर्दी जमवल्याच्या प्रकरणी पबवर गुन्हा नोंद

एका पबमध्ये कोरोनाशी संबंधित नियमांचे उल्लंघन करत पुष्कळ गर्दी जमवल्याप्रकरणी पबवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रहित करण्यात आला आहे.