आता कृषी क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्रांचा सहभाग वाढवण्याची वेळ आली आहे ! – पंतप्रधान मोदी

नवी देहली – कृषी क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकास करण्यामध्ये अधिक सहभाग सरकारी यंत्रणांचाच आहे; मात्र आता वेळ आली आहे की, यामध्ये खासगी क्षेत्राची भागीदारी वाढली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्रालयाच्या वेबिनारमध्ये बोलतांना केले.

‘आम्ही शेतकर्‍यांना असे पर्याय देऊ की ते गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन करण्यापुरतेच सीमित रहाणार नाहीत’, असेही त्यांनी सांगितले.