ऑस्ट्रेलियाच्या संसदेत अधिकार्‍याकडून अश्‍लील कृत्य केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याने जनतेमध्ये संताप

खासदार हे वेश्यांना संसदेत घेऊन आल्याचा आरोप

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये सरकारी अधिकारी अश्‍लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जनतेमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरून याचा विरोध करत आहे. ‘दी ऑस्टे्रलियन’ या दैनिकाने आणि ‘चॅनेल १०’ या वृत्तवाहिनीने अश्‍लील कृत्याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

१. यापूर्वी एका महिला सल्लागाराने संसदेच्या परिसरात तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप केला होता. या महिला सल्लागाराने ‘सरकारच्या बड्या नेत्यांपासून मोठ्या अधिकार्‍यांना हा प्रकार ठाऊक असूनही आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही’, असा आरोप केला होता. वर्ष २०१९ मध्ये एका सहकार्‍याने तिच्यावर बलात्कार केला होता; मात्र सरकारने या गुन्ह्यात कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाच्या काही शहरांमध्ये आंदोलनही झाले होते.

२. टॉम नावाच्या व्यक्तीने सांगितले की, सरकारी अधिकारी आणि खासदार नेहमी संसदेतील प्रेयर रूमचा वापर शारीरिक संबंधांसाठी करतात. खासदारांसाठी उच्चभ्रू वेश्यादेखील संसदेत आणल्या जातात. संसदेत अशी संस्कृती बनलीय कि पुरुष जे हवे ते करू शकतात.