उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणेे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे. साधूंचा तोंडावळा चिरडण्यात आल्याचे आढळले आहे. साधूंचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसून आले आहे.
(सौजन्य : prime 18news)
येथील काही लोकांनी सांगितले की, २ दिवसांपूर्वी या साधूंना एका तरुणाच्या घरामध्ये पहाण्यात आले होते. साधूंचा मृतदेह सापडल्यावर हा तरुण बेपत्ता झाला आहे. साधूंचे नाव रामचंद्र असून ते इस्लामनगर येथील सोहरा गावातील निवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !