बंद केलेल्या भ्रमणभाष क्रमांकाचा वापर पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवीन ग्राहक रिसायकल केलेल्या क्रमांकाद्वारे जुन्या ग्राहकाच्या क्रमाकांशी निगडीत माहिती पाहू शकतात. त्यांच्या बँक खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते.

भारताने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचा सल्ला भारतात ‘फिल्ड रुग्णालये’ उभारली पाहिजेत

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाला अमेरिकेची मान्यता !

पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे.

आम्ही भारतीय आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार ! – अमेरिकेला उपरती

लवकरच आम्ही भारतातील नागरिक आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे.

अमेरिकेचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीला आवश्यक कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार

अमेरिका भारताचा मित्र असल्याचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र संकटाच्या काळात जो साहाय्य करतो, तोच खरा मित्र असतो. अमेरिकेने दाखवलेला हा कृतघ्नपणा पहाता अमेरिका भारताचा खरा मित्र होऊ शकत नाही, हे भारतियांनी कायमचे लक्षात ठेवावे !

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाक यांच्यात मोठे युद्ध ! : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

या अहवालात युद्धाचे कारणही सांगण्यात आले आहे. या ५ वर्षांत भारतात मोठे आतंकवादी आक्रमण होईल. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकार पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर आक्रमण करील आणि युद्धास प्रारंभ होईल.

अमेरिका येथे रहाणार्‍या रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू !

अमेरिका येथे वास्तव्यास असलेल्या बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला.

भारताचा जीडीपी १२.५ टक्के होण्याची शक्यता ! – जागतिक नाणेनिधीचा अंदाज

भारताचा विकासदर विक्रमी म्हणजे १२.५ टक्के इतका असेल, असे जागतिक नाणेनिधीने तिच्या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२२ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी  वृद्धींगत होईल, असेही नाणेनिधीने यात म्हटले आहे.

अमेरिकेत बंदुकांची मोठ्या प्रमाणात विक्री !

उच्चशिक्षित आणि प्रगत समाज (?) असणार्‍या अमेरिकेतील समाजजीवन किती खालावले आहे, हेच यातून दिसून येते !