भारतात आतंकवादी कारवाया करणार्या जिहादी आतंकवादी संघटनांच्या प्रमुखांना भारत पाकमध्ये घुसून का ठार करत नाही ?, असा प्रश्न अशा घटनांवरून जनतेच्या मनात येतो, याचा सरकारने विचार केला पाहिजे ! – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख आतंकवादी अबू इब्राहिम अल्-हाशिमी अल्-कुरेशी याला सीरियामध्ये ठार केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्वीट करून दिली. या कारवाईत ६ मुलांसह किमान १३ जण मारले गेल्याचे सांगितले जात आहे. तुर्कस्तानच्या सीमेजवळील एटमेह शहरात अमेरिकी सैन्याने ही कारवाई केली. सैनिकांनी शहरातील एका इमारतीला लक्ष्य केले, जिथे युद्धामुळे सहस्रो नागरिक विस्थापित म्हणून राहत होते.
Last night at my direction, U.S. military forces successfully undertook a counterterrorism operation. Thanks to the bravery of our Armed Forces, we have removed from the battlefield Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi — the leader of ISIS.
https://t.co/lsYQHE9lR9— President Biden (@POTUS) February 3, 2022
बायडेन म्हणाले की, ३ फेब्रुवारीच्या रात्री आमचे सैन्य आतंकवाद्याला पकडण्यासाठी पोचल्याचे लक्षात येताच त्याने इमारतीमध्ये स्वतःला उडवून देण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा इतर लोकांच्या जिवाची पर्वा न करता कुरेशी याने या स्फोटाच्या वेळी कुटुंबातील अनेक सदस्यांना समवेत घेतले.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan