(म्हणे) ‘भारतातील हिंदु राष्ट्रवाद हा चिंतेचा विषय !’

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची अमेरिकेतील भारतविरोधी संघटनेच्या कार्यक्रमात टीका

  • भारतात हिंदु राष्ट्रवाद नव्हे, तर ‘इस्लामी राष्ट्रवाद’ हा गेली ७४ वर्षे चिंतेचा विषय राहिला आहे. ‘इस्लामी राष्ट्रवादा’मुळेच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशसंहार करून त्यांना तेथून हाकलण्यात आले, याविषयी अन्सारी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक
  • ‘इस्लामिक स्टेट’सारख्या अमानुष जिहादी आतंकवादी संघटना संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरली असतांना त्याविरोधात एकतरी मुसलमान नेता जागतिक व्यासपिठावर तोंड उघडतो का ? – संपादक
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

नवी देहली – भारतातील हिंदु राष्ट्रवाद हा चिंतेचा विषय आहे. देशातील लोकांना धर्माच्या आधारावर विभागले जात आहे. राष्ट्रीयतेवरून लोकांमध्ये वाद निर्माण केला जात आहेत. विशेष करून एका धर्माच्या लोकांना भडकावले जात आहे. असहिष्णुतेला प्रोत्साहन दिले जात आहे आणि देशामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे, अशी विधाने भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम काऊंसिल’च्या एका कार्यक्रमात भारताच्या प्रजासत्ताकदिनी केली. ज्या ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम काउंसिल’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या संघटनेवर भारतात दंगली घडवणे आणि पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचा आरोप आहे.