कोरोना लसीकरणाची सक्ती आणि हेटाळणी केल्याने कॅनडाच्या पंतप्रधानांच्या घराभोवती २० सहस्र ट्रकचालकांचा ट्रकसह घेराव

ट्रुडो यांनी काढला पळ

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (डावीकडे)

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या येथील शासकीय निवासस्थानाबाहेर २० सहस्र ट्रकसह घेराव घालण्यात आला आहे. ट्रकचालकांच्या वेढ्यामुळे ट्रूडो यांनी कुटुंबियांसमवेत गुप्त स्थानावर निघून जाण्यासाठी पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रुडो यांनी काही काळापूर्वी कॅनडामध्ये कोरोना लसीकरणाची सक्ती केली होती. तसेच ट्रकचालकांना ‘अजिबात महत्त्वाचे नसलेले अल्पसंख्यांक घटक’ असे म्हणत टीका केली होती. यामुळे ट्रकचालक चिडले आणि त्यांनी थेट ट्रुडो यांच्या निवासस्थानावर धडक दिली.