भारतापेक्षा अमेरिकेत कितीतरी पटींनी प्रतिदिन गुन्हे घडत असतात, वांशिक आक्रमणे होत असतात, हे पहाता अमेरिकची ही सूचना म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होत ! – संपादक
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी नागरिकांनी आतंकवाद आणि नागरी अशांतता लक्षात घेता भारताच्या जम्मू-काश्मीर राज्यात प्रवास करू नये. भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किलोमीटर आत जाऊ नका; कारण सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. भारतीय अधिकार्यांच्या अहवालामध्ये ‘बलात्कार हा भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्या गुन्ह्यांपैकी एक आहे’, असे म्हटलेले आहे. लैंगिक अत्याचारासारखे हिंसक गुन्हे पर्यटन आणि इतर ठिकाणी घडले आहेत. यामुळे पुन्हा विचार करा, अशी सूचना अमेरिकेने तिच्या नागरिकांना दिला आहे.
अमेरिकेने भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर बोट ठेवले आहे. भारतात फिरण्यास जात असाल तर पुनर्विचार करावा, असा इशारा नागरिकांना दिला आहे. #America #Rape #India #UShttps://t.co/hVCGw2qAYB
— Lokmat (@lokmat) January 26, 2022