असे प्रसंग टाळण्यासाठी शिक्षेसमवेतच समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
सिंधुदुर्ग – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील अजित अर्जुन देसाई या युवकाला जिल्हा न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. २७ फेब्रुवारी २०१८ या दिवशी ही घटना घडली होती. शाळेत जात असतांना संशयित आरोपी देसाई याने विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिली होती.