राज्यातील ३ प्रकल्पांमुळे वन्यजीव नष्ट होणार असल्याने हस्तक्षेप करावा ! – आमदार विजय सरदेसाई यांची ‘युनेस्को’कडे मागणी

पणजी, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – मोले ते वास्को राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कुळे ते वास्को रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण आणि तम्नार ते गोवा उच्चदाबाची वीजवाहिनी या तिन्ही प्रकल्पांमुळे गोव्यातील वन्यजिवांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात. या प्रकरणी पॅरीस येथील ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर’चे संचालक आणि स्वित्झरलंड येथील ‘आय.यू.सी.एन्.’चे संचालक यांनी हस्तक्षेप करून वन्यजिवांचे रक्षण करावे, अशी मागणी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. एका पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

आमदार विजय सरदेसाई पत्रात पुढे म्हणतात, ‘‘हे प्रकल्प मोले येथील अभयारण्यातून जात असल्याने तेथील अनेक वन्यजीव लुप्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.’’