पुण्‍यातील दगडूशेठ मंदिरामध्‍ये विविध धार्मिक विधींसह अतीरुद्र महायज्ञाला प्रारंभ !

जगाचे कल्‍याण, तसेच महाराष्‍ट्र ‘सुजलाम् सुफलाम्’ होण्‍यासाठी दगडूशेठ गणपति मंदिरामध्‍ये महासुदर्शन होम, संतान गोपाळ कृष्‍ण होम, विष्‍णुसहस्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यांसह विविध प्रकारच्‍या धार्मिक विधींनी अन् ११ दिवसांच्‍या ‘अतीरुद्र महायज्ञा’ला प्रारंभ करण्‍यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील २० मंदिरांत माहेश्‍वरी महिला मंडळाकडून वस्‍त्रसंहितेचे फलक !

माहेश्‍वरी महिला मंडळाने यासाठी पुढाकार घेत २० मंदिरांच्‍या दर्शनी भागात पोस्‍टर्स लावली आहेत. भाविकांनी कोणता पोशाख परिधान करावा, कोणता करू नये, याविषयी सूचना लावल्‍या आहेत.

मणीपूर हिंसाचारावरील टिप्‍पणीवरून भारताकडून अमेरिकेच्‍या राजदूतांची कानउघाडणी !

मणीपूरमधील ख्रिस्‍ती जमातीकडून हिंसाचार केला जात असून भारतीय सुरक्षायंत्रणा त्‍यांच्‍या विरोधात कारवाई करत आहेत. त्‍यामुळे ख्रिस्‍तीधार्जिण्‍या अमेरिकेला पोटशूळ उठतो, यात काय ते आश्‍चर्य ?

सनदी अधिकार्‍यांना देणार छत्रपती शिवरायांच्‍या राजकारभाराचे धडे !

शिवरायांच्‍या राजकीय कारकिर्दीतील अनुभव, कार्य आणि संदर्भ यांचे संकलन, संपादन आणि प्रकाशन करण्‍यासाठी राज्‍यशासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’ स्‍थापन केली आहे.

लोक मुसलमानांच्या भेदभावाविषयी का बोलतात ?, हा प्रश्‍न पडतो ! – हुमा कुरेशी, अभिनेत्री

हुमा कुरेशी यांच्या वक्तव्याविषयी ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे सांगणार्‍यांना काय म्हणायचे आहे ?

तिरंग्‍याच्‍या आडून कुणी भगव्‍या ध्‍वजाला विरोध करत असेल, तर सकल हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पंतप्रधानांच्‍या नावे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, देश स्‍वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्‍याचार सहन करत आहे. त्‍यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे.

महिलांवरील अत्‍याचाराची संख्‍या अल्‍प होत नाही ! – रूपाली चाकणकर, अध्‍यक्षा, राज्‍य महिला आयोग

कोल्‍हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेले वर्षभर मी महिला आयोगाच्‍या निमित्ताने सुनावणी घेण्‍यासाठी राज्‍यभर फिरत आहे. प्रत्‍येक ठिकाणी गेल्‍यावर सुनावणीसाठी महिला अल्‍प संख्‍येने अल्‍प असतील असा विचार करते; मात्र त्‍यांची संख्‍या वाढलेलीच दिसते. त्‍यामुळे दुर्दैवाने महिलांवरील अत्‍याचारांची संख्‍या वाढलेलीच दिसते, तसेच महिलांवरील अत्‍याचारांविषयी महाराष्‍ट्रात जागृती नाही, त्‍यासाठी समाजाची मानसिकता पालटली पाहिजे, असे मत राज्‍य महिला … Read more

पुणे येथे सराईत गुन्‍हेगारांविरोधात पोलिसांचा आक्रमक पवित्रा !

शहरात गुंड टोळक्‍यांकडून वाहनांची तोडफोड आणि दहशत माजवण्‍याच्‍या घटना होत आहेत. त्‍यामुळे पोलीस आयुक्‍त रितेश कुमार यांनी सराईत गुन्‍हेगारांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन गुन्‍हे शाखा आणि सर्व पोलीस स्‍थानकांना गुन्‍हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍या अन्‍वये ३ जुलै या दिवशी शहरातील विविध भागांत ‘कोम्‍बिंग ऑपरेशन’ राबवून १५९ गुन्‍हेगारांना कह्यात घेतले आहे.

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

हिंदूंची कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असणार्‍या देवस्थानांच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण केले जाते; मात्र वक्फच्या संदर्भात तसे काहीच होत नाही, हीच धर्मनिरपेक्षता आहे, हे लक्षात घ्या !

ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश !

सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्याच्या संदर्भात ‘सटरफटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.