समाजातील गुन्हेगारी पूर्णपणे संपण्यासाठी रामराज्याप्रमाणे आदर्श व्यवस्था असणारे हिंदु राष्ट्रच हवे !
पुणे – शहरात गुंड टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड आणि दहशत माजवण्याच्या घटना होत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्थानकांना गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अन्वये ३ जुलै या दिवशी शहरातील विविध भागांत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून १५९ गुन्हेगारांना कह्यात घेतले आहे. शहरात २८ ठिकाणी नाकाबंदी करून ३ सहस्र २८२ संशयित वाहनचालकांची पडताळणी करण्यात आली. त्यांपैकी ४७५ जणांवर १ लाख २ सहस्र रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे, तसेच गुन्हे शाखेने १३ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली. या मोहिमेच्या दरम्यान ११ आरोपींना कह्यात घेऊन १ बंदूक, २ जिवंत काडतुसे, १० हत्यारे शासनाधीन केली आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
संपादकीय भूमिकानियमितपणेच पोलीस गुन्हेगारांच्या विरोधात आक्रमक कारवाई का करत नाहीत ? |