बंगालमध्ये मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

भारतात काही ठिकाणी मतदानाच्या वेळी हिंसाचार होणे ही सर्वसामान्य घटना झाली आहे. बॉम्ब, बंदूक आदींचा सर्रास वापर या वेळी केला जातो. यातून भारतातील मतदान कसे होते, हे लक्षात येते !

(म्हणे) ‘हिंदु आणि मुसलमान मतांच्या विभाजनाला विरोध करणार !’ – ममता बॅनर्जी यांचे फुकाचे बोल

स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी हिंदू ममता(बानो) यांची कथित धर्मनिरपेक्षता ओळखून आहेत !

जर आम्ही हिंदूंना आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असती !

पंतप्रधान मोदी यांची मुसलमानांकडे मतांचे आवाहन करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

बंगालमध्ये भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

बंगालमधील अशा प्रकारचा हिंसाचार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी बंगाली जनता निवडणुकीद्वारे प्रयत्न करणार का ?

हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करणे आवश्यक ! – सोवन सेनगुप्ता, शास्त्र प्रचार सभा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला महर्षि योगी अरविंंद यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वत:मध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. सोवन सेनगुप्ता यांनी केले.

बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे घायाळ झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू

काही आठवड्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांच्या घरात घुसून त्यांची ८५ वर्षीय आई शोभा मजुमदार यांना मारहाण केली होती. तेव्हापासून त्या घायाळ होत्या. त्यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले.

बंगालमध्ये भाजपच्या महिला उमेदवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी या रसायन मिश्रित रंग फेकल्याने घायाळ

बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, तेथे अराजक माजल्याचे दिसून येते.

बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर आक्रमण

बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !

(म्हणे) ‘भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, ४ नवीन पाकिस्तान बनतील !’

केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !

असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्‍चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !