याला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाका !
कोलकाता (बंगाल) – काही आठवड्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांच्या घरात घुसून त्यांची ८५ वर्षीय आई शोभा मजुमदार यांना मारहाण केली होती. तेव्हापासून त्या घायाळ होत्या. त्यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले.
भाजपा कार्यकर्ता की वृद्ध मां का निधन, तृणमूल कार्यकर्ताओं पर लगा था पिटाई का आरोप#WestBengalElections #BengalElections2021 #ViolenceInWestBengal https://t.co/n0zjjT0SQE
— Dainik Jagran (@JagranNews) March 29, 2021
याविषयी भाजपचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले. अमित शहा यांनी म्हटले, ‘तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी त्यांना इतकी मारहाण केली की, त्यांचा मृत्यू झाला. अहिंसामुक्त बंगालसाठी, तसेच माता-भगिनींसाठी या राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी बंगाली जनता लढेल.’ तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी म्हटले की, आमचा संबंध नाही, त्या पडल्यामुळे घायाळ झाल्या होत्या.