(म्हणे) ‘हिंदु आणि मुसलमान मतांच्या विभाजनाला विरोध करणार !’ – ममता बॅनर्जी यांचे फुकाचे बोल

मुसलमानांना तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्याचे प्रकरण

स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी हिंदू ममता(बानो) यांची कथित धर्मनिरपेक्षता ओळखून आहेत !

कोलकाता (बंगाल) – निवडणूक आयोग मला १० नोटिसा पाठवू शकतो; परंतु त्याचे उत्तर एकच असणार आहे. मी कायम हिंदु आणि मुसलमान मतांच्या विभाजनाच्या विरोधात बोलत रहाणार. मी धर्माच्या आधारावर मतदारांचे विभाजन करण्याच्या विरोधात उभी राहीन, असे वक्तव्य बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिसीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. (सातत्याने मुसलमानांना चुचकारणार्‍या आणि हिंदुविरोधी कारवाया करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक) ‘मुसलमान मतदारांनी तृणमूल काँग्रेसला मतदान करावे’, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात हिंदु आणि मुसलमान मतपेढी यांचा उल्लेख करतात. त्या वेळी त्यांच्या विरोधात कुठलीच तक्रार का दाखल होत नाही ? असा प्रश्‍न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. नंदिग्राममध्ये निवडणूक असतांना काही नेत्यांनी ‘मिनी पाकिस्तान’ या शब्दाचा उपयोग केला होता. त्यांच्या विरोधात किती तक्रारी दाखल झाल्या ? असाही प्रश्‍न त्यांनी आयोगाला विचारला. (‘मिनी पाकिस्तान’ हा शब्द ममता बॅनर्जी यांना एवढा का झोंबतो ? जे सत्य आहे, ते उघडपणे मांडले, तर त्यात चूक ते काय ? – संपादक)