हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करणे आवश्यक ! – सोवन सेनगुप्ता, शास्त्र प्रचार सभा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलीदानदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन

कोेलकाता – भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्यापासून तेे राममंदिरासाठी हुतात्मा झालले सर्व जण आमच्यासाठी आदरणीय आहेत. आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हुतात्मा न होता समर्पित होऊन कार्य करायचे आहे. यासाठी आपल्याला महर्षि योगी अरविंंद यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वत:मध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शास्त्र धर्म प्रचार सभेचे श्री. सोवन सेनगुप्ता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय साधक समाज, बंगालचे श्री. अनिर्बान नियोगी, सामाजिक माध्यम कार्यकर्ते श्री. प्रकाश केवट आणि समितीचे पूर्व अन् पूर्वोत्तर भारत राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाचा लाभ झारखंड, बंगाल, आसाम आणि मणिपूर येथील अनेक हिंदु धर्मप्रेमींनी घेतला.

अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन

 श्री. प्रकाश केवट – क्रांतीकारकांनी वैयक्तिक जीवनातील सुखांचा त्याग करून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग गेला. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे.

 श्री. अनिर्बान नियोगी – गांधीजींनी क्रांतीकारकांची फाशी थांबवण्यासाठी प्रयत्न केला असता, तर ती थांबवता आली असती, हा इतिहास आपल्याला जाणून घेतला पाहिजे.

 श्री. शंभू गवारे – भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावाने हिंदु राष्ट्राच्या कार्यात स्वतःचे योगदान दिले पाहिजे.