धाडस असेल, तर भाजप सरकारने चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावे ! – असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान

ओवैसी म्हणाले, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात ? तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात आणि चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा, आम्ही तुमची प्रशंसा करू !

ओवैसी विकास नाही, तर रोहिंग्यांना भारतात आणण्याची मागणी करतात ! – खासदार तेजस्वी सूर्या, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे  इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

३० सहस्र रोहिंग्यांची मतदार सूचीमध्ये नोंद होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का ? – असदुद्दीन ओवैसी यांचे तेजस्वी सूर्या यांना प्रत्युत्तर

जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे.

तेलंगाणा वक्फ बोर्डाच्या सीईओंना हटवण्याचा तेलंगाणा उच्च न्यायालयाचा आदेश

तेलंगाणा उच्च न्यायालयाने नुकतेच तेलंगाणाच्या वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महंमद कासिम यांना तात्काळ बडतर्फ करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. राज्यात वक्फ बोर्डाची १ लाख कोटी रुपयांची भूमी आहे.

(म्हणे) ‘संपूर्ण देशात एम्.आय.एम्.’ झेंडा फडकवत असल्याचे जग पाहील !’ – अकबरुद्दीन ओवैसी

जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकांनी दिले एक दिवसाचे वेतन !

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य म्हणून प्रत्येक जण पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) सैनिकांनीही स्वेच्छेने त्यांचे एक दिवसाचे वेतन दिले आहे.

दळणवळण बंदी असतांनाही तेलंगण येथे चारचाकीतून फिरणार्‍या तरुणाला अटक

येथील पोलिसांनी दळणवळण बंदी असतांनाही चारचाकी वाहनातून फिरणार्‍या एका २० वर्षीय तरुणाला अटक करून त्याला विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. ‘हा तरुण खोकत असल्याचे आढळून आल्याने त्याला या केंद्रात पाठवण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.