पटियाला गुरुद्वारामध्ये महिलेची हत्या : मारेकर्‍याला अटक

महिला दारू पित असतांना गुरुद्वाराच्या कर्मचार्‍यांनी तिला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा महिलेने कर्मचार्‍यांवर दारूच्या बाटलीने आक्रमण केले. त्याच वेळी निर्मलजीत सिंह तेथे आला आणि त्याने ५ गोळ्या झाडून तिची हत्या केली.

पाकने १९८ भारतीय मासेमार्‍यांची केली सुटका !

भारतीय मासेमार्‍यांना समुद्रातील सीमा लक्षात येण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यामुळे चुकून सीमा ओलांडल्यामुळे या मासेमार्‍यांना होणारा नाहक त्रास अल्प होऊ शकेल !

सुवर्ण मंदिराच्या परिसरात झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात ५ जणांना अटक

सुवर्ण मंदिराच्या परिसरात एका आठवड्यात ३ स्फोट झाले. ६ मे या दिवशी सुवर्ण मंदिराच्या जवळ असलेल्या हॅरिटेज स्ट्रीटच्या परिसरात स्फोट २ स्फोट झाले. ८ मे या दिवशी तिसरा स्फोट झाला.

पाकिस्तानी ड्रोन पुन्हा अमृतसरमध्ये घुसले : दीड किलो हेरॉईन जप्त !

सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळील ‘हेरिटेज स्ट्रीट’वर पुन्हा स्फोट !

अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळील ‘हेरिटेज स्ट्रीट’वर ८ मे या दिवशी सकाळी ६ वाजता पुन्हा स्फोट झाला. सकाळची वेळ असल्याने या मार्गावर कुणीही नसल्याने जीवीतहानी टळली.

वीजकपात करण्यासाठी पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी २ या वेळेत चालू रहाणार !

सरकारची होणार ७० कोटी रुपयांची बचत !

पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !

लुधियाना (पंजाब) येथे वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू

वायू गळतीच्या घटनेमुळे अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन हा संपूर्ण परिसर बंद केला. या वायू गळतीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पंजाबमध्ये गुरुद्वारात घुसून एका तरुणाने केला गुरु ग्रंथसाहिबचा अवमान !

‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.