Punjab And Haryana HC : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ठोठावला ५० सहस्र रुपयांचा दंड !

  • अधिवक्त्याने व्हॉट्सॅप गटावर हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याचे प्रकरण

  • आरोपीच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याचे बार काऊन्सिलला निर्देश !

चंडीगड – व्हॉट्सॅप गटावर हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याच्या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका अधिवक्त्याला दोषी ठरवून त्याला ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. प्रीतपाल सिंह असे या अधिवक्त्याचे नाव आहे. उच्च न्यायालयाने बार काऊन्सिलला आरोपी अधिवक्त्याचे काम आणि वर्तन यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. पक्षकारांमधील सामंजस्य कराराच्या आधारे गुन्हा रहित करून न्यायमूर्ती कुलदीप तिवारी म्हणाले की, भविष्यात याचिकाकर्त्या आरोपीकडून तत्सम गुन्हा घडल्यास, त्याच्यावर योग्य शिस्तभंगाची कारवाई करावी.

अधिवक्ता प्रीतपाल सिंह यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्या विरोधात अशोक सरीन यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. या तक्रारीच्या आधारे  सिंह यांच्याविरोधात पंजाबमधील होशियारपूर येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर या प्रकरणातील पक्षकारांमध्ये सामंजस्य करार झाला आणि त्यामुळे खटला रहित करण्याची याचिका न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती.