पतियाळा (पंजाब) – जर वर्ष १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी मी पंतप्रधान असतो, तर पाकिस्तानकडून कर्तारपूर साहेब परत घेतले असते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते येथे आयोजित एका प्रचारसभेला संबोधित करतांना बोलत होते. जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा कर्तारपूर साहेब गुरुद्वारा हा पाककडे गेला. कर्तारपूर साहेब गुरुद्वारा भारताच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,
१. देशाच्या फाळणीला काँग्रेसच उत्तरदायी आहे.
२. ७० वर्षांपासून आपण कर्तारपूर साहेब गुरुद्वारा दुर्बिणीतून पहात होतो. वर्ष १९७१ मध्ये हा गुरुद्वारा भारतात येऊ शकत होता. काँग्रेसने हेसुद्धा केले नाही; मात्र वर्ष २०१९ मध्ये आमच्या सरकारने कर्तारपूर साहेब या ठिकाणी जाण्याचा मार्ग खुला केला.
३. पंजाबमध्ये अमली पदार्थांचे माफिया आणि ‘शूटर्स गँग’ यांचे राज्य चालू आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे केवळ कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंजाबच्या परिस्थितीशी काहीच घेणेदेणे नाही. अशा परिस्थितीत पंजाबचा विकास कसा होईल ?