‘झी’कडून आम आदमी पक्षाच्या सरकारवर आरोप
नवी देहली – पंजाबमध्ये ‘झी’ प्रसारमाध्यमांच्या सर्व वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. वाहिनीनेच ही माहिती दिली आहे. वाहिनीने सांगितले, ‘पंजाबमध्ये ‘झी मीडिया’च्या सर्व वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. तेथील लोकांना त्यांच्या घरात झीच्या वाहिन्या पहाता येत नाहीत. हे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे.’ पंजाबमध्ये आप (आम आदमी पार्टी) सरकार आहे आणि भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
१. भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान लोकशाहीबद्दल बोलतात; पण त्यांच्या विरोधात कुणी सत्य दाखवले, तर ते दाबून टाकतात.
२. जनता दल (संयुक्त) पक्षाचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी याचा निषेध केला आणि सांगितले की, आप पक्ष प्रसारमाध्यमांचा आवडता पक्ष म्हणून जन्माला आला. देहलीतील रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांचा पुष्कळ प्रसिद्धी दिली होती.
संपादकीय भूमिकाआम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही ! हाच पक्ष अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही याचा गप्पा मारतो, हे संतापजनक ! |